रत्नाकर मतकरी यांच्या साहित्यावर एकांकिका स्पर्धा, राज्यभरात 11 केंद्रांवर होणार प्राथमिक फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरात नवनवीन एकांकिका स्पर्धा होत असताना, साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित एकांकिका सादरीकरणाची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘रत्नाकर करंडक 2022’ असे या स्पर्धेचे नाव असून पहिल्या वर्षी प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांच्या साहित्यावर आधारित एकांकिका स्पर्धा होणार आहे. यामध्ये मतकरींच्या कथा, नाटक, कादंबऱया, कविता, ललित लेख इत्यादी अनेक साहित्य प्रकारांपैकी कोणत्याही साहित्यप्रकाराचा आधार घेऊन एकांकिका सादरीकरण करता येईल.

ओम आर्ट्सचे डॉ. संतोष पोटे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले असून संकल्पना भूषण देसाई यांची आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी एकूण  11 केंद्रांवर घेण्यात येईल. अंतिम फेरी पुणे येथे बालगंधर्व नाटय़गृहात होणार आहे. अंतिम फेरीसाठी प्रत्येक पेंद्रातून दोन संघ निवडण्यात येणार असल्याने 22 संघ अंतिम फेरीत निवडले जाणार आहेत. अंतिम फेरीसाठी मंगेश कदम, राजन भिसे, सुप्रिया विनोद, विजय केंकरे परीक्षक आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपर्क- भूषण देसाई 9960300966/ अनिकेत शहाणे 9320282006

एक लाखाचे बक्षीस

पहिले पारितोषिक एक लाख रुपये तर द्वितीय पारितोषिक 75 हजार रुपये तर तृतीय पारितोषिक 50 हजार रुपये आहे. प्रेक्षक पसंती पिंवा विशेष लक्षवेधी एकांकिकेस 25 हजार रुपये पारितोषिक आहे. तसेच वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येतील.