विमान प्रवासात अभिनेत्रीचा विनयभंग, एकाला अटक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्रीशी अश्लील वर्तन केल्या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील व्यावसायिकाला सहार पोलिसांनी अटक केली. नितीन बंसल असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार या अभिनेत्री असून त्या अंधेरी परिसरात राहतात. त्यांनी काही हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

1 ऑक्टोबरला त्या कामानिमित्त दिल्लीला विमानाने गेल्या होत्या. त्यानंतर त्या 3 ऑक्टोबरला मुंबईला येण्यासाठी त्या इंदिरागांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या. त्या खासगी विमानाने मुंबईला येत होत्या. तेव्हा ओव्हरहेड बिन येथे ठेवलेली बॅग काढताना अज्ञात व्यक्तीने तक्रारदार यांच्याशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर महिलेने घडल्या प्रकाराची माहिती विमानातील क्रू ना दिली. महिलेने सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला. तपासा दरम्यान नितीनचे नाव समोर आले.