वास्कोमधील एकाचा कोरोनामुळे मृत्यू; मृतांचा आकडा 9 वर

गोव्यातील वास्को येथील 50 वर्षांच्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 9 वर गेली आहे. वास्कोमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून आतापर्यंत वास्कोमधील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि होणाऱ्या मृत्यूमुळे वास्कोमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वास्कोमधील 50 वर्षांच्या रुग्णाला सात दिवसांपासून ताप येत होता. त्याला सुरूवातीला चिखली येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. तेथे श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे बुधवारी रात्री त्याला गोमेकॉमध्ये हलवण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या रुग्णाच्या मृत्यूमुळे गोव्यातील कोरोनाबळींचा आकडा 9 वर गेला आहे. वास्को शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. आतापर्यंत वास्कोमधील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या