
अंधेरी येथील गोखले पुलावर भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री जुहू पोलिसांचे विशेष पथक हे गस्त करत होते. तेव्हा एक जण गंभीर अवस्थेत पडून होता. त्याला पोलिसांनी कूपर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जुहू पोलीस अधिक तपास करीत आहेत.