
वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत विरूद्ध दिशेने दुचाकी चालवून एकाला धडक दिल्याची घटना हडपसरमध्ये घडली होती. उपचारादरम्यान संबंधिताचा मृत्यू झाला आहे. हा अपघात दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेनउच्या सुमारास भाजीमार्केटजवळ घडला. याप्रकरणी दुचाकीचालकाला अटक केली आहे.
संतोष प्रल्हाद तुपे असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीचालक रजनिकांत बाबुराव कांबळे (25) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी दुचाकीस्वार रजनिकांत दोन मित्रांसह हडपसरमधील भाजीमार्केटमधून जात होता. त्यावेळी त्याने विरूद्ध दिशेने दुचाकी चालवून संतोष तुपे यांना धडक दिली. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



























































