दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, चार गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथरी

राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी फाट्याजवळ बुधवारी दुपारी 4.30 वाजता टाटा पॅशिओ आणि स्विप्ट डिझायर कारची समोरासमोर धडक होऊन यात स्विफ्ट कारचा चालक जागीच ठार झाला. अपघात 11 जण जखमी जखमी झाले असून 4 गंभीर जखमींना उपचारार्थ परभणीला रवाना करण्यात आले आहे.

गेवराईहून पोहरादेवीकडे जाणारी टाटा पॅशिओ क्रमांक एम.एच.23 इ- 5344 आणि स्विप्ट डिझायर क्रमांक एम.एच.24- व्ही-8789 यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये स्विप्ट चालक लिंबाजी बन्सी चाटे (वय 35) रा.तांबवा ता.केज जागीच मृत्यू पावले. अपघातात जातेगाव (ता.गेवराई) येथील बाबासाहेब जाधव (वय 36), जिजाबाई काला राठोड (वय 48), कमलबाई बालासाहेब जाधव (वय 50), मालाबाई उत्तम पवार (वय 50) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अतुल बालासाहेब जाधव (14), रत्नमाला प्रकाश ढोरमारे (20), शुभम रोहीदास पवार (12), स्वप्निल रेहिदास पवार (8), शामल रेहिदास पवार (36), काला गवा राठोड (61), बप्पासाहेब पांडूरंग खंडागळे (52) गेवराई हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहीती मिळताच रामप्रसाद कुटे, प्रताप शिंदे, अमोल शिंदे यांच्यासह अन्य काहींनी जखमींना तात्काळ मदत करून पाथरी ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यासाठी मदत केली.