
रस्त्यावरून भरधाव टेम्पो चालवणाऱ्या चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात काल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील हांडेवाडी चौकात घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.
भाउसाहेब अशोक गायकवाड (44) असे ठार झालेल्याचे नाव आहे. प्रकाश रामस्वामी पवार (25, रा. येवलेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बबन गायकवाड यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
काल सकाळी पावणेअकराच्या सुमारास प्रकाश दुचाकीवरून जात होते. त्यावेळी हांडेवाडी चौकात भरधाव टेम्पोचालक प्रकाशने त्यांना धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे भाऊसाहेब यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. राऊत तपास करीत आहेत.





























































