चोबळी रोडवर मोटारसायकल अपघातात मुंबईच्या युवकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरुर ताजबंद

शिरुर ताजबंद येथील चोबळी रोडवर स्वागत बारच्या समोर मुंबई येथील युवक मोटारसायकलवरून माकणीला जात असतांना घसरून दगडावर आपटला व जागीच ठार झाला.

निखील विलास घटकांबळे (वय २४) रा. वाल्मीक नगर महालक्ष्मी धोबी घाट घाटकोपर वेस्ट मुंबई हा मित्राच्या लग्नासाठी माकणी येथे काही पाहुण्यांसोबत आला होता. अजय आंडीगीरे व रोहीत वाघमारे हे दोन्ही मुंबईचेच त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते. ते तिघेही एकाच मोटरसायकलवरून प्रवास करीत होते. तेही गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री १:३० वाजता झाला.