लातूरात किरकोळ वादातून बीअरच्या बाटलीने एकाचे डोके फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूरमध्ये किरकोळ वादातून एकाचे बीअरच्या बाटलीने डोके फोडल्याची घटना घडली आहे. तू याला सोबत घेऊन का बसलास, अशी विचारणा करत वादाला सुरुवात झाली होती. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात एकाच्या डोक्यात बीअरची बाटली मारण्यात आली. या प्रकरणी चार जणांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शंकर प्रभाकर कांबळे (रा. झिंगणप्पा गल्ली, लातूर) याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पप्पू परमेश्वरे (रा. क्वाईल नगर, लातूर) आणि इतर तिघांनी मित्राला तू याला सोबत घेऊन का बसलास अशी विचारणा करत शिवीगाळ केली. त्यातून त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर त्या चौघांनी डोक्यात बिअरची बाटली घालून शंकर याचे डोके फोडले. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. गांधी चौक पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी गुंडरे करीत आहेत.