बीडमध्ये स्वाईन फ्लूचा आणखी एक बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यात स्वाईन फ्लूने हाहाकार उडवून दिला आहे, एकीकडे डेंगू आणि दुसरीकडे स्वाईन फ्लूमुळे जनतेत दहशत निर्माण झाली आहे. यातच बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना काल रात्री आणखी एकाचा बळी गेला आहे.

केज तालुक्यातील युसूफवडगावच्या उपसरपंचाचे वडील गुरूराज थळकरी यांचे स्वाईन फ्लूने कालरात्री उपचारादरम्यान बीड शासकीय रुग्णालयामध्ये निधन झाले. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेकडो जणांना सर्दी, ताप, खोकला सुरू आहे. ही लक्षणे स्वाईन फ्लूची असल्याने तपासणीसाठी मोठी गर्दी होत आहे. जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूवर उपचारासाठी वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे.

summary- one more died due to swine flue in beed