मराठा आरक्षणाचा तिसरा बळी, कोपरखैरणेच्या आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान कोपरखैरणे येथे झालेल्या हिंसाचाराच्यावेळी गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा शुक्रवारी जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रोहन तोडकर (२१) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.

२५ जुलै रोजी झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नवी मुंबईतील कोपरखैरणे, कळंबोली येथे मोठ्या प्रमाणात दंगल झाली होती. या ठिकाणी जमावाने पोलिसांवर दगडफेक करत गाड्या जाळल्या होत्या. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. या दंगलीच्या वेळी रोहन गंभीर जखमी झाला होता.

summary : youth who injured in maratha reservation protest at koperkhairne succumbed to injuries