भोकर येथे वीज कोसळून एका शेतमजूराचा मृत्यू; एक मुलगा जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नांदेड

मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात भोकर शिवारातील एका शेतात मंगळवारी सायंकाळी वीज कोसळून शेतमजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच एक लहान मुलगाही जखमी झाला आहे.

सायंकाळी ६.३० वाजता अचानकपणे भोकर परिसरात सुसाट वारा व मेघगर्जनेसह पाऊस सुरु झाला. यात सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास भोकर- नांदेड रस्त्यावरील आश्रम शाळे मागील माळ शिवारात काम करत असलेल्या शेतमजूर (सालगडी) देवीदास गणेश उपाडे (४१) यांच्यावर वीज कोसळली व यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेला लहान मुलगा कोंडदेव देविदास उपाडे (७) हा जखमी झाला आहे.

महसूल प्रशासनाच्या वतीने घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून जखमी मुलास उपचारार्थ भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृत शेतमजूराचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला आहे.