जालन्यातील शेलवडा शिवारात वीज कोसळून एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील शेलवडा शिवारात मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून शेतगड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

जालना जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून विविध भागात गारपिट, वादळ-वाऱ्यासह पाऊस पडत आहे. आजही अशीच ढगाळ वातावरण होते. शेलवडा शिवारात राजेंद्र चोरडिया यांचे शेत आहे. त्यांच्याकडे रामधन बळीराम चव्हाण ( वय 30) हा शेतकामगार सालगडी म्हणून कामाला होता.

मंगळवारी दुपारी 12.30 वाजता शेतातील काम करत असताना रामधन यांच्यावर वीज कोसळली. यात जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. रामधन हे मूळचे जिंतूर तालुक्यातील राहणारे असल्याची माहिती मिळाली आहे. परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दुपारी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.