जालना जिल्ह्यातील वाढोणा येथे ट्रॅक्टर खदानीत उलटून तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथील ज्ञानेश्वर रमेश पवणे ( वय 27) हा तरुण सोमवारी सायंकाळी 5 वाजता ट्रॅक्टरने जात असताना वाढोणा येथे ट्रॅक्टर खदानीत उलटला. या अपघातात त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथील गरीब कुंटूबातील ज्ञानेश्वर पवणे तरूण वाढोणा येथील सुरेश डोभाळ यांच्या ट्रॅक्टरवर रोजंदारीवर ट्रॅक्टरचालक म्हणून काम करत होता. सोमवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास डोंगराळ भागातील गुट्टीच्या खदानीपासून कल्टीवेटर करून येत असताना बाजूला असलेल्या खदानीचा अंदाज त्याला आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर चीनचार वेळा उलटून खदानीत पडला. यात चालक ज्ञानेश्वर पवने याला डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने त्याचा जागेवर मृत्यु झाला आहे. या संदर्भात पारध ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ऊबाळे, बिट जमादार प्रदिप सरडे, जिवन भालके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.