सारसबागेजवळ रिक्षाच्या धडकेत जेष्ठ नागरिक ठार

भरधाव वेगात रिक्षा चालवून जेष्ठ नागरिकाला धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सारसबागेजवळील सावरकर चौकात घडली.

जगन्नाथ तोडकर (वय 75, रा. पर्वतीगाव ) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल तोडकर यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ हे 12 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास सावरकर चौकात  रस्ता ओलांडत होते. त्यावेळी समोरुन आलेल्या रिक्षाचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे जगन्नाथ गंभीर  जखमी झाले. उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान  त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. एस. लाहोटे तपास करीत आहेत.

हडपसर जकात नाक्यावर वाहनाच्या धडकेत एक ठार
पुणे- हडपसरहून सासवडकडे जाणार्‍या वाहनचालकाने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. ही घटना दोन दिवसांपुर्वी हडपसर जकातनाका परिसरात घडली. दत्तात्रय भगवान मारवाळ रा. भेकराईनगर असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विष्णू परदेशी (वय 51 रा. भेकराईनगर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. भाबड तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या