
OnePlus ने आज हिंदुस्थानमध्ये OnePlus 9RT हा स्मार्टफोन आणि OnePlus Buds Z2 हे इयरबर्डस लॉन्च केले आहेत. OnePlus 9RT हा स्मार्टफोन OnePlus 9R चा अपडेट व्हर्जन आहे. काही दिवसांपूर्वीच हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. या दोन्ही फोनबाबत जाणून घेऊया…
OnePlus 9RT चे फीचर्स
– 6.62 इंचाचा full-HD+ Samsung E4 AMOLED डिस्प्ले
– Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर
– 12 GB रॅम आणि 256GB की इंटरनल स्टोरेज
– 4,500mAh ची ब२टरी
फोटोग्राफीसाठी OnePlus 9RT या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असून 16 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो शूटर यात देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा यात आहे.
OnePlus 9RT च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आणि 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 46,999 रुपये आहे. हा फोन 17 जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
Great things are here to stay because the new #OnePlus9RT5G is Geared for Greatness. Get your hands on a smartphone experience you always wished for.
RCC early access sale starts on 16th Jan 12AM
Know more: https://t.co/LmWJwNsEtg pic.twitter.com/KJEhY9OXf4
— OnePlus India (@OnePlus_IN) January 14, 2022
OnePlus Buds Z2 TWS
यात पूर्वीचेच डिझाईन वापरण्यात आले आहे. OnePlus Buds Z2 TWS मध्ये 11mm डायनामिक ड्रायव्हर्स देण्यात आले असून कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth v5.2 चा सपोर्ट आणि टच कंट्रोल देण्यात आला आहे. याची बॅटरी 36 तास सेवा देते असा दावा कंपनीने केला असून याची किंमत 4999 रुपये ठेवण्यात आली आहे. काळ्या आणि पांढऱ्या रंगात हे इयरबर्डस उपलब्ध असून 18 जानेवारीपासून ग्राहक याची खरेदी करू शकतील.
It’s time to immerse in the world of music and get ready to #PlayWithSilence. Get your hands on the OnePlus BudZ2 with early access for members at the Red Cable First Sale on 17th Jan and Open Sale starting 18th Jan. pic.twitter.com/ZTlqa64s5B
— OnePlus India (@OnePlus_IN) January 14, 2022



























































