OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा स्फोट, कंपनीने दिले स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी बेंगरुळूमध्ये OnePlus Nord 2 5G या फोनचा स्फोट झाल्याचे वृत्त होते. तेव्हा कंपनीने आपली काही चूक नसल्याचे सांगितले होते. आता पुन्हा एकदा OnePlus Nord 2 5G फोनचा स्फोट झाला आहे. एका वकीलाच्या ऑफिसमध्ये हा स्फोट झाला आहे. या प्रकरणी कंपनीने स्पष्टीकरणी दिले आहे.

OnePlus Nord 2 5G ची किंमत 27 हजार 999 इतकी आहे. गौरव गुलाटी हे व्यवसायाने वकील असून ते आपल्या ऑफिसमध्ये बसले होते तेव्हा त्यांच्या OnePlus Nord 2 5Gचा स्फोट झाला. गुलाटी यांनी फोनचे फोटो ट्विटरवर पोस्ट करून याबाबत तक्रारही केली होती.

वन प्लस कंपनीने त्यांना प्रतिसाद देत फोनची पाहणी करण्याची मागणी केली. तसेच कंपनीचे कर्मचारी गुलाटी यांच्या देखरेखेखाली फोन तपासतील असेही सांगितले. परंतु कंपनीचे कर्मचारी फोनशी छेडछाड करतील असा संशय गौरव गुलाटी यांनी व्यक्त केला. तसेच वन प्लस कंपनीविरोधात आपण याचिका दाखल करणार असून या कंपनीवर बंदी आणावी अशी मागणी करणार असल्याचेही गुलाटी यांनी सांगितले.