
सामना प्रतिनिधी । सटाणा
सटाणा तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्रीचे प्रशांत महाजन यांनी 30 क्विंटल लाल कांदा सटाणा बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. लिलावात त्यांच्या कांद्याला निव्वळ दीड रुपया किलो असा बाजारभाव मिळाल्याने अपेक्षाभंग झाला. तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाजवळ कांदा ओतून देत आपला संताप व्यक्त केला.



























































