कांदा महागला! केंद्रीय अन्नमंत्री पासवान यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार

455

कांद्याचा भाव जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे, त्याबाबत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान हे जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप करत बिहारमधील एका सामान्य नागरिकाने पासवान यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

बिहारच्या मुझफ्फरपूर येथील राजू नय्यर याने पासवान यांच्याविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱयांकडे तक्रार केली आहे. त्याआधारे पासवान यांच्याविरुद्ध कलम 420, 506 आणि 397 अन्वये अनुक्रमे फसवणूक, धमकावणे आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या