आजपासून अकरावी ऑनलाईन प्रवेश, 5 डिसेंबरला दुसरी गुणवत्ता यादी

शिक्षण संचालनालयाने अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आज 26 नोव्हेंबरपासून प्रवेशाला सुरुवात होणार असून 5 डिसेंबरला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. मराठा आरक्षणातील रिक्त जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट केल्या जाणार आहेत. मुंबईसह पुणे, पिंपरी, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश होणार आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीनंतर मुंबई विभागात 72,559 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून 2 लाख 48 हजार 281 जागा रिक्त आहेत. या जागांमध्ये मराठा आरक्षणातील जागांची भर पडणार आहे.

वेळापत्रक
n 26 नोव्हेंबर – प्रवेश फेरी-2 साठी रिक्त जागा जाहीर
n 26 नोव्हें. ते 1 डिसें. – ऑनलाइन अर्ज भरणे, पसंतीक्रम
n 2 डिसेंबर – ऑनलाइन अर्जाची पडताळणी
n 3 ते 4 डिसें. – पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी अंतिम करणे
n 5 डिसेंबर – दुसरी गुणवत्ता यादी
n 5 ते 9 डिसेंबर – दुसऱया यादीनुसार प्रवेश घेणे
n 10 डिसेंबर – तिसऱया गुणवत्ता यादीसाठी रिक्त जागा जाहीर
ऑनलाइन प्रवेशादरम्यान व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटय़ातील प्रवेश सुरू राहतील.
पहिल्या गुणवत्ता यादीत प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले, प्रवेश रद्द केलेले, प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱया गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी.
प्रवेशाची वेबसाईट
https://mumbai.11thadmission.org.in/
मुंबई विभागातील आतापर्यंतचे प्रवेश
कनिष्ठ महाविद्यालये 844
एपूण जागा 3,20,840
ऑनलाइन प्रवेश 48,284
इनहाऊस कोटा 7008
अल्पसंख्याक कोटा 15,757
व्यवस्थापन कोटा 1510
पहिल्या फेरीअखेर एपूण प्रवेश 72,559

  • दुसऱया फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास किंवा प्रवेश नाकारल्यास पुढील प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार नाही. या विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता यादीतच प्रवेशाची संधी.
आपली प्रतिक्रिया द्या