नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाकरीअर पोर्टल, आज ऑनलाईन कार्यशाळा

563

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील करीअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आज 30 जून सकाळी 11 वाजता या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा googlmeet आणि YouTube वर होणार आहे.

बारावीनंतर विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध कॉलेज, त्यांची प्रवेशप्रक्रिया तसेच उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्त्या याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही ऑनलाईन कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, अशी सूचना शिक्षण विभागाने शाळांना केली आहे.

याविषयी विद्यार्थ्यांना मिळणार माहिती
– 21 हजार कॉलेजेस

-करिअरचे 555 पर्याय
– 1150 प्रकेशप्रक्रिया

– 1200 शिष्यवृत्त्या

ऑनलाईन कार्यशाळेत सहभागीसाठी
googlemeet –
https://meet.google.com/esvesv-dmom-dsg
YouTube –
http://YouTube.be/pizHjkREYQo

आपली प्रतिक्रिया द्या