
अजमेरला एक ट्रिप नेण्यासाठी ड्रायव्हर पाहिजे अशी ओएलएक्सवर जाहिरात त्याने पाहिली. त्याने मालकाला संपर्क साधून टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसने नागरिकांना अजमेरलाही नेले, पण तेथे गेल्यानंतर त्याने बस पुन्हा आणण्याऐवजी स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली. बस मालकाला तो गंडवू लागला. बरेच दिवस त्याने असे नाटक केले. अखेर पंतनगर पोलिसांनी त्याला अजमेर येथील एका टोल नाक्यावर पकडून बस पुन्हा आणली.
युगांक शर्मा (22) असे त्या आरोपीचे नाव आहे. युगांक मुलाखतीसाठी मुंबईत आल्याचे कळताच पंतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सुहास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र पाटील तसेच शिंदे, गांजाळे, तांदळे, जटिथेर, अनुसे व सोनवणे या पथकाने तपास सुरू केला. युगांकची माहिती काढून पथक अजमेरला गेले, पण युगांक तेथे नव्हता, तर तो एका ट्रॅव्हल कंपनीत चालकासाठी मुलाखत देण्याकरिता मुंबईत आला होता.























































