अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा, महाविद्यालये गोंधळात; विद्यापीठाची ढकलपट्टी

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठांनी महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेण्याच्या सूचना प्राचार्यांना दिल्या आहेत. मात्र परीक्षा कशी घ्यायची याचे मार्गदर्शनच केले नसल्याचा आरोप काही महाविद्यालयांनी केला आहे. याचा फायदा घेऊन सॉफ्टवेअर वापरण्याऐवजी काही महाविद्यालये गुगल फॉर्मवर प्रश्नपत्रिका देण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षेवेळी विद्यार्थी कॉपी करतोय का याकडे पाहणे शक्य होणार नाही, असे काही प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

अंतिम वर्षाची परीक्षा ही वैकल्पिकपद्धतीने (मल्टीपल चाँईज) होणार आहे. राज्य सरकारने सर्व विद्यापीठांना सूचना केल्या आहेत की त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच द्यावा आणि ही परीक्षा कशी घेणार हे सांगावे. किद्यापीठाने हे काम महाविद्यालयांवर सोपवले आहे. विविध विद्यापीठांनी त्यांच्या- त्यांच्या पद्धतीने प्रश्नपत्रिका आणि प्रश्नसंच द्यायला सुरुवात केली आहे. काही कॉलेजेसनी फक्त 25 प्रश्नांचा प्रश्नसंच तयार केला असून तीच प्रश्नपत्रिका म्हणून द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीत भिन्नता निर्माण झाली आहे.

महाविद्यालयांना 25 ते 40 प्रश्नांची परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 25 प्रश्नांसाठी प्रत्येकी दोन तर 40 प्रश्नांसाठी सव्वा गुण अशी 50 गुणांची परीक्षा होईल. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी महाकिद्यालयांना विशिष्ट सॉफ्टकेअर घेण्याची सक्ती विद्यापीठाने केलेली नाही माञ महाविद्यालयांनी सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करणारे सॉफ्टकेअर वापरावे जेणेकरून परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडतील. – विनोद पाटील, परीक्षा नियंत्रक, मुंबई विद्यापीठ.

विद्यापीठाने 25 गुणांची नमुना प्रश्नपत्रिका दिली आहे. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयांनी प्रश्नपात्रिका तयार करायची आहे. कॉपी टाळण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे संच तयार करण्यात आले असून प्रत्येक किद्यार्थ्याला मिळणारी प्रश्नपञिका ही एकसारखी नसेल. 50 गुणांची परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी एक तासांचा वेळ देण्यात आला आहे.
– टी. ए. शिकारे, अध्यक्ष, नाँन गव्हर्नमेंट काँलेज प्रिन्सिपल असोसिएशन.

सॉफ्टवेअर वापराबाबत मार्गदर्शन हवे
विद्यापीठाने प्रश्नसंचाचा नेमका आकार, आणि कोणते सॉफ्टवेअर वापरणार याची एक गाईडलाईन तयार करणे आवश्यक असल्याचे काही प्राध्यापकांनी सांगितले. कॉपी रोखण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये कोणकोणते सुरक्षा ऑप्शन असावेत याविषयी विद्यापीठांनी सखोल मार्गदर्शन करणे आवश्यक आहे अन्यथा ढ विद्यार्थी गुगल फॉर्म आणि फक्त 25 प्रश्नांची प्रश्नपत्रिका सोडवून पास होतील, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या