
सामना ऑनलाईन । मुंबई
जम्मू-कश्मीरमध्ये लागू असलेले 370 कलम हटवण्याची मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे. हे कलम हटवल्यानंतर सैनिकांवर होणारे हल्ले आणि दगडफेक थांबेल. त्यासाठी ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे. या कलमातील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-कश्मीरसाठी केवळ संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे. इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. याचा फुटीरतावादी आणि पाकिस्तान गैरफायदा घेत असून यथे दहशतवादी कारवाया घडवून आणत आहे. हे सर्व थांबावे यासाठी येथे लागू असलेले कलमच हटवण्याची मागणी आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. तसेच ही मागणी आणखी तीव्र होण्यासाठी ऑनलाईन साइन इन करून पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.





























































