ओटीटीवर हिंदुस्थानी प्रेक्षक फिदा, अमेरिकेनंतर सर्वात मोठे मार्केट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लॉकडाऊनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकांनी जास्त वेळ घालवला. त्यामुळे हिंदुस्थानातील ओटीटी मार्पेट अचानक तेजीत आले आहे. सध्या हिंदुस्थानात 40 पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत, जिथे प्रेक्षकांना ओरिजनल कंटेट मिळत आहे. ओटीटी आणि वेबसीरीजवर प्रदर्शित होणारे सिनेमा नवनवीन रेकाॅर्ड करत आहेत. त्यामुळे अनेक प्रोडक्शन हाऊसने सिनेमांसारखे वेबसीरीजवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

45 टक्के वाढ

एन्टरटेन्मेंट रिपोर्टनुसार, 2023 सालापर्यंत हिंदुस्थानी ओटीटी मार्केटमध्ये 45 टक्के वाढ होईल. त्यामुळे आर्थिक उलाढाल 130 अब्ज रुपयांची असेल. सध्या हिंदुस्थानचे ओटीटी मार्केट 250 कोटी आहे. अर्नेस्ट अँड यंगच्या अहवालानुसार या वर्षाच्या अखेरीस देशातील ओटीटी युजर्सची संख्या 50 कोटी होणार आहे. अमेरिकेनंतर हिंदुस्थान हे दुसरे सर्वात मोठे ओटीटी मार्केट असेल.

ओरिजनल कंटेटला महत्त्व

अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मने ओरिजनल कंटेट दिले आहेत. सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, पाताललोक, बंदिश बेंडिट्स, दिल्ली क्राईम, बेताल, आश्रम, क्वीन, स्कॅम 1992 अशा ओरिजनल कंटेन्टवाल्या वेबसीरीज लोकप्रिय झाल्या आहेत. अल्ट बालाजी, अरे, टीव्हीएफ प्ले, इरोस नाऊ, जियो सिनेमा, होईचोई, अहा, अरे हे प्लॅटफॉर्मही लोकप्रिय झाले आहेत.

म्युझिकवाले प्लॅटफॉर्म कोणते?

अॅमेझॉन म्युझिक, अॅपल म्युझिक, गाना, गुगल प्ले म्युझिक, हंगामा, जियो सावन, साऊंड क्लाऊड, स्पॉटिफाय, विंक, युटय़ूब म्युझिक.

लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म कोणते?

  • अमेझॉन प्राईम – हादेखील हिंदुस्थानचा लोकप्रिय ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. यावर सहा भाषांतील सिनेमा आणि वेबसीरीज स्ट्रिम होतात.
  • हॉटस्टार – 2015 मधील या प्लॅटफॉर्मचे देशात सर्वात जास्त सबस्क्रायबर आहेत. अलीकडेच या प्लॅटफॉर्मने वॉल्ट डिस्नेसोबत भागीदारी केली.
  • नेटफ्लिक्स – अमेरिकेची स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स, दिल्ली क्राईम, बेताल, घोल असे ओरिजिनल कंटेन्ट प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत. 2018च्या आकडेवारीनुसार नेटफ्लिक्सचे 60 लाख सबस्क्रायबर होते.
  • वूट – वूट ही एक व्हिडिओ ऑन डिमांड सर्व्हिस आहे. हा प्लॅटफॉर्म केवळ हिंदुस्थानात उपलब्ध आहे.
  • झी 5 – या प्लॅटफॉर्मवर युजर्सला 12 भाषांमध्ये कंटेट उपलब्ध आहेत. लवकरची झी 5 सशुल्क सबस्क्रायबरसाठी झी 5 क्लब

सुरू करणार आहे.

सोनी लिव – सोनी पिक्चर नेटवर्कची ही एन्टरटेन्मेंट आणि व्हिडिओ ऑन डिमांड सेवा आहे.
एमएक्स प्लेयर – मोफत सेवा देणाऱया या प्लॅटफॉर्मचे 28 कोटी युजर्स आहेत. यावर ओरिजनल वेबसीरीज, सिनेमा दाखवले जातात. अलीकडेच ‘डेंजरस’ आणि ‘आश्रम’ या वेबसीरीज प्रदर्शित झाल्या आहेत.