
सामना प्रतिनिधी, मुंबई
दररोजच्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या पश्चिम उपनगरवासीयांसाठी ‘वांद्रे-वर्सोवा सी लिंक’ हा सागरी मार्ग प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा, या मागणीसाठी ऑनलाइन याचिका मोहीम राबविण्यात येत असून दैनंदिन प्रवास करणारे स्थानिक रहिवाशी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास वरळी ते वर्सोवा प्रवास केवळ 15 मिनिटात पूर्ण होणार आहे.
‘मुंबई मचमच’ या ऑनलाइन ग्रुपने पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीविषयी ऑनलाइन याचिका केली आहे. पश्चिम उपनगरे नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड ताणावाखाली आहेत. रस्त्यावरील कासवगतीने सरकत जाणाऱ्या वाहतुकीने प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला असून ‘मुंबई मचमच’ रोजच्या वाहतूककोंडीची समस्या ट्विटर तसेच ईमेलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिका प्रशासनालाही सांगण्यात आली आहे.
याचिकेतील ठळक मुद्दे
प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण व्हावा तसेच सिंगल विंडो क्लिअरन्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंत्राटदाराला निधी उपलब्ध व्हावा.
गर्दीच्या काळात पी. डिमेलो रोडवर सकाळची आणि चेंबूर दरम्यान संध्याकाळची वाहतूक कोंडी एखाद्यासाठी डोकेदुखी ठरते. या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होऊन वेळेचीही बचत होईल.
विविध जंक्शन्सवरील प्रवेश आणि निर्गमन मार्ग शास्त्रशुद्धपद्धतीने हाताळण्यात येतील, जेणेकरून काहतूक कोंडी होणार नाही.
गृहपर्याय निकडताना लोकांचा पायाभूत सुकिधांकडे कल असतो, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास लोकांची पश्चिम उपनगराची पसंती वाढेल.


























































