नेतृत्वाच्या मार्गावर आव्हाने अनेकमहिला आज अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र कंपन्यांमध्ये मोठय़ा पदांवर काम करणाऱया महिलांची संख्या कमी आहे. महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेत येताना अनेक आव्हाने आहेत.
एडेलगिव्ह फाऊंडेशन या संस्थेने अर्थक्षेत्रातील महिलांच्या नेतृत्वावर एक अभ्यास अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या अहवालानुसार नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध दोन हजार कंपन्यांमध्ये फक्त पाच टक्के म्हणजे 100 कंपन्यांमध्ये महिला सीईओ आहेत.
‘पाथवेज टू लीडरशिप फॉर वुमेन इन फायनान्स अँड इकोनॉमिक्स’ असे या अभ्यासाचे नाव असून त्यात महिला नेत्यांनी व्यावहारिक दृष्टिकोन, नवकल्पना आणि ईएसजी (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) या उपक्रमांवर भर दिला. याबाबत एडेलगिव्ह फाऊंडेशनच्या कार्यकारी अध्यक्ष विद्या शाह म्हणाल्या, ‘‘महिलांना नेतृत्वपदे मिळविण्यातील खरे अडथळे त्यांच्या जीवनात लवकर सुरू होतात. शाळेतील शैक्षणिक विषयांच्या निवडीपासून ते काळजी घेण्याच्या जबाबदाऱया महिलांवर येतात. वेगवेगळ्या स्तरांवर त्यांना संघर्षाला तोंड द्यावे लागते. त्यांनी केवळ तात्कालिक आव्हानांचा सामना केलाच पाहिजे असे नाही, तर वर्षानुवर्षे निर्माण झालेली दीर्घकालीन असमानताही दूर केली पाहिजे.’’
कंपन्यांच्या वाढीसाठी नेतृत्वाच्या पदांसाठी महिलांची पाइपलाइन स्थापन करणे महत्त्वाचे आहे. यादृष्टीने हा अहवाल महत्त्वाचा असल्याचे फाऊंडेशनच्या सीईओ नघमा मुल्ला म्हणाल्या.
– 2030 पर्यंत जीडीपी वृद्धी दर 8 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी महिलांच्या नेतृत्वातील तफावतीमुळे संधी गमावलेली आहे, असे निरीक्षण या अभ्यासातून मांडण्यात आले आहे.
– मध्यम व्यवस्थापन पदांवर पुरेशा महिला नाहीत. स्त्रिया घरातील जबाबदाऱयांचा खूप मोठा वाटा उचलतात, ज्यामुळे आपोआपच असे दिसून येते की, त्यांना त्यांच्या करीअरमध्ये पुरुषांइतके लक्ष केंद्रित करता येत नाही आणि शेवटी त्या स्वतःला मागे खेचतात.
महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याचे मार्ग
– नियुक्ती आणि पदोन्नतीसाठी न्याय्य धोरणे स्वीकारणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षा कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि प्रभावी तक्रार यंत्रणा आणि बालसंगोपन समर्थनासह पालक-अनुकूल धोरणे लागू करणे.
– समावेश आणि जागरुकताः महिला-पेंद्रित धोरणे, लिंग जागरुकता कार्यक्रम.