20 हजार चाचण्या 89 बाधित, एकाच महिन्यात सातव्यांदा शून्य मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मुंबईत चाचण्यांच्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण चांगलेच घटून 0.4 टक्क्यांवर आले आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 20 हजार 073 चाचण्यांमध्ये केवळ 89 बाधित आढळले आहेत. शिवाय फेब्रुवारीत आज सातव्यांदा शून्य मृत्यू नोंदवला गेल्याने मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत यापूर्की 15, 16, 17, 20, 23 आणि 25 फेब्रुकारीला शून्य मृत्यूची नोंद झाली होती. तर तिसऱया लाटेत 2 जानेकारीनंतर 15 फेब्रुकारी रोजी मुंबईत पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाक केल्यानंतर 17 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. यानंतर डिसेंबर 2021 रोजी सात केळा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान, मुंबईत आढळलेल्या रुग्णांमधील 20 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील सहाजणांना ऑक्सिजनची गरज लागली, तर एकाच दिवसात 200 जणांनी कोरोनावर मात केली.

मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड
z सक्रिय रुग्ण – 902
z बरे होण्याचा दर –
98 टक्के
z रुग्णवाढीचे प्रमाण –
0.02 टक्के
z रुग्ण दुपटीचा कालावधी – 4450 दिवस