
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
माझी फलंदाजीची शैली आक्रमक पद्धतीची आहे, पण मी ज्या प्रकारे युवा क्रिकेटपटू असताना फटकेबाजी करायचो तशी फटकेबाजी करणे आता तितके सोपे जाणार नाही. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळी मी अत्यंत चपळ होतो, आता मात्र तसे असेलच असे नाही. मला खात्री आहे की प्रत्येक संघातील खेळाडूंच्या मनात कुठे तरी हा विचार सुरू असणारच की जगातील सगळ्यात धोकादायक फलंदाज या विश्वचषकात खेळणार आहे. कारण मी मैदानावर काय करू शकतो हे सगळ्या संघांना माहीत आहे अशी डरकाळी फोडत वेस्ट इंडीजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेल याने जगातल्या अन्य संघांना गर्भित इशाराच दिला आहे. माझ्या या दहशतीचा मला आनंद आहे. वेगवान गोलंदाजांचा सामना करताना मला खूप मजा येते असेही त्याने सांगितले.
Opponents know what I’m capable of: Chris Gayle
Read @ANI Story | https://t.co/YsFbarb3mY pic.twitter.com/9OhVBonWeR
— ANI Digital (@ani_digital) May 22, 2019





























































