सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, स्वातंत्र्यवीर व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होण्याची चिन्हे

597

देशाच्या स्वातंत्र्यासाठी दोनदा जन्मठेपेची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या चहापानाला आमची जाण्याची तयारी नाही अशी भूमिका घेत विरोधी पक्षाने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. मात्र अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न मांडू. आम्हाला शेतकऱयांच्या प्रश्नावर चर्चा करायची आहे आणि चर्चेची संधी दिली नाही तर आक्रमकपणे भूमिका मांडू, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात 93 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱयांना हेक्टरी 25 हजार रुपयेप्रमाणे 23 हजार कोटी रुपये तत्काळ द्यावेत. या सरकारने शेतकऱयांना दिलेला शब्द पाळला पाहिजे. अवकाळीग्रस्त शेतकऱयांना दिलेला मदतीचा शब्द पाळावा याची या सरकारला अधिवेशनात आठवण करून देणार आहोत, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी निषेध केला.

फेरआढावा घेण्यासाठी सरकारने सध्या कामे थांबवलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाला आहे. ज्या सरकारच्या धोरणांमध्ये सातत्य राहत नाही त्या राज्यातील गुंतवणुकीवर परिणाम होतो. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामांना स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारने आठ हजार कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला त्याला या सरकारने स्थगिती दिली आहे, असे फडणवीस म्हणाले.

अधिवेशन कागदोपत्री
महाराष्ट्रात सरकारचा शपथविधी होऊन अनेक दिवस उलटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अधिवेशनात कोणाला प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नाचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार की नाही, असा सवाल करून फडणवीस म्हणाले, नागपूरच्या अधिवेशनाबाबत हे सरकार गांभीर्यपूर्ण नाही. केवळ वेळकाढूपणाचे धोरण म्हणून अधिवेशन कागदोपत्री घेण्याचा फार्स करीत आहेत.

आसाम, पश्चिम बंगालपाठोपाठ दिल्लीतही भडका
नागरिकत्व कायद्यावरून ईशान्य हिंदुस्थानात पसरलेल्या आगीच्या ज्वाला रविवारी दिल्लीत पोहोचल्या.
आंदोलनकर्त्यांनी तीन बसेस, एक अग्निशमन दलाची गाडी आणि काही मोटरसायकल जाळल्या. यात दोन जवान जखमी झाले.
दक्षिण दिल्लीतील चार मेट्रो स्टेशन्स प्रशासनाने बंद केली.
पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार. अश्रुधुराच्या नळकांडय़ाही फोडल्या.

आपली प्रतिक्रिया द्या