सौदाळे ग्रा.प भ्रष्टाचार; उपोषण मागे, सीईओंचे बीडीओंना गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

ग्रामपंचायतीच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या देवगड तालुक्यातील सौंदाळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी देवगड गटविकास अधिकारी यांना दिले. त्यामुळे सौदाळे ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देवगड गटविकास अधिकारी यांना सौंदाळे माजी सरपंचांवर कारवाई करा अशी सूचना देवून सुद्धा कारवाई करण्यास बीडीओ टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गुरूवार पासून जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. भ्रष्टाचार करणाऱ्यावर व त्याला पाठीशी घालणाऱ्या देवगड बीडीओंवर कारवाई करा ही प्रमुख मागणी या ग्रामस्थांची होती. दरम्यान, या उपोषणाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी घेत सौंदाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे आदेश देवगड बीडीओंना दिले आहेत.