ओडिशातील पुरी शहरात 24 तास मिळणार शुद्ध पाणी, प्लास्टिकचा वापर घटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील पुरी या शहरात आता 24 तास शुद्ध पाणी मिळणार आहे. अशी सुविधा जगात फक्त लंडन, न्युयॉर्क आणि सिंगापूर सारख्या शहरांत आहे. ही योजना केवळ 9 महिन्यांतच पूर्ण झाली आहे. यामुळे प्लास्टिकचा वापरही कमी होणार आहे.

सोमवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सुजल योजनेचे उद्घाटन केले. पुरी येथे सुप्रसिद्ध जगन्नाथाचे मंदिर आहे. या मंदिरात देशच नव्हे तर संपूर्ण जगातून भाविक येतात. आता पुरी शहराचे रहिवासी आणि पर्यटक अशा दोन कोटी लोकांना 24 तास नळातून शुद्ध पाणी मिळणार आहे. 400 ठिकाणी पाण्याचे नळ बसवण्यात आले असून तिथे प्लॅस्टिकच्या बाटलीचीही सुविधा देण्यात आली आहे.


24 तास शुद्ध पाणी मिळाल्यामुळे प्लास्टिक वापरण्याचे प्रमाणही आटोक्यात येणार आहे. अशा प्रकारची सुविधा फक्त लंडन, सिंगापूर आणि न्युयॉर्क सारख्या शहरांत आहे.

या प्रकल्पामुळे पुरीतील दरवर्षी 3 कोटी प्लास्टिक बाटल्यांचा वापर कमी होणार आहे. अवघ्या 9 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.