ऑस्कर मिळूनही बॉलीवूडमध्ये मला काम मिळाले नाही! साऊंड डिझायनर रसुल पुकुट्टी यांची खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्याविरोधात उठवल्या जाणाऱ्या अफकांमुळे चित्रपटसृष्टीत आपल्याला काम मिळणे बंद झाले आहे, असे धक्कादायक विधान नुकतेच ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए.आर. रेहमान यांनी केले होते. त्यापाठोपाठ आता ऑस्कर पुरस्कार विजेते साऊंड डिझायनर रसूल पुकुट्टी यांनीदेखील ट्विटरवर आपली खंत व्यक्त केली आहे. ऑस्कर मिळूनदेखील आपल्याला बॉलीवूडमध्ये काम मिळाले नाही असे त्यांनी म्हटले आहे.

संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या ट्विटला उत्तर देताना दिग्दर्शक शेखर कपूर म्हणाले की, ‘ए.आर. रेहमान तुला खरी समस्या माहितेय का? तुला ऑस्कर मिळाला आहे. आणि ऑस्कर मिळणे म्हणजे बॉलीवूडमधील करीयरच्या मरणाला स्पर्श करणे. तुझ्यात असलेले कौशल्य बॉलीवूड हाताळू शकत नाही. हा त्याचा पुरावा आहे. ‘दरम्यान, शेखर कपूर यांच्या या ट्विटला रसुल पुकुट्टी यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘शेखर कपूर याबाबत मला विचारा. मी या समस्येतून गेलो आहे. ऑस्कर मिळूनदेखील बॉलीवूडने माझी दखल घेतली नाही आणि प्रादेशिक चित्रपटांनी मला घट्ट पकडले होते. काही प्रॉडक्शन हाऊसने तर तुमची गरज नाही असे थेट सांगितले होते. तरीही या इंडस्ट्रीवर माझे प्रेम आहे.’