ऑस्करमध्ये सर्वोत्कष्ट अभिनेत्री ठरलेली एमा स्टोन झाली भावूक

जगभरातील सिनेकलाकारांना ज्या पुरस्काराची उत्सुकता असते तो 96 वा ऑस्कर सोहळा नुकताच संपन्न झाला.या सोहळ्यात ‘पुअर थिंग्स’ या सिनेमासाठी अभिनेत्री एमा स्टोन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून एमाचे नाव घेताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. आश्चर्य व्यक्त करत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन लक्षवेधक होते.

या पुरस्कार सोहळ्यादरम्यान एमा स्टोन हिचा ड्रेसही फाटला. ऑस्कर सोहळ्यात तिचे नाव कानावर पडताच तिला विश्वास बसेना. तिला आश्चर्य वाटले ती स्तब्ध झाली. मात्र त्यानंतर तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. ड्रेस सावरत ती व्यासपीठावर गेली. पुरस्कार मिळाल्यानंतर तिने बोलताना आपला ड्रेस फाटल्य़ाबाबत सांगितले. त्यानंतर आभार व्यक्त करताना ती भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.