
मोबाईल चोरीच्या गुह्यात एकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अक्षय डुगडल असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 89 मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याने ते चोरीचे मोबाईल हे एका ब्रिजखाली लपवून ठेवल्याचे तपासात समोर आले. अक्षयला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या अटकेने 19 गुह्यांची उकल करण्यात यश आले आहे. अक्षयचा दुसरा साथीदार हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार हे ओशिवरा परिसरात राहतात. तीन दिवसांपूर्वी ते एका इमारतीच्या शॉपमध्ये झोपले होते तेव्हा अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल चोरून पळ काढला. तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रभात मानकर, सहायक निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक दीपक थोरात, पवार, भंडारे, जगदाळे, राठोड, सकट, पाटील, भंगड यांनी यशस्वी तपास केला.