
मराठा समाज आरक्षणाचे आंदोलन चिघळले असून कळंब – धाराशिव या बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.
सगेसोयर्यांची आरक्षणात अंमलबजावणी सरकार करत नसल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध आक्रमक होत आंतरवाली सराटी येथून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास धाराशिव – कळंब ही बस (एमएच-14 बिटी 2611) धाराशिव येथून ढोकी मार्गाने कळंब कडे येत असताना पिंपळगाव पाटी जवळ अज्ञात लोकांनी दूचाकीने येउâन बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत बसच्या पुढील काच फुटून सुमारे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान बीड जिल्ह्यातील वडवणी येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक होऊन त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सामुहिक दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजीही केली.

























































