प्रथमेशचा ‘डार्लिंग’ आता ओटीटीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्री यांच्या ‘डार्लिंग’ या मराठी चित्रपटाने सिनेमागृहांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऍमेझॉन प्राइमच्या माध्यमातून जगभरातील 200 पेक्षा जास्त देशांमध्ये ‘डार्लिंग’ पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केला आहे. फुल टू फॅमिली एंटरटेन्मेंट असलेला ‘डार्लिंग’ प्रेक्षकांना भावला. संगीतकार चिनार-महेश यांच्या संगीताची जादूही चालली. आता घरी बसूनच ‘डार्लिंग’ पाहता यावा यासाठी निर्माते आणि व्हिडीओ पॅलेसने ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध करून रसिकांना पर्वणी दिली आहे.