मराठी भाषा दिवस व शिवराय संचलनाची शनिवारी रूपरेषा बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने सर्व पदाधिकाऱयांची बैठक शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

27 फेब्रुवारी रोजी होणाऱया मराठी भाषा दिवस व शुक्रवार, 13 मार्च रोजी होणाऱया शिवराय संचलन या दोन्ही कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा आखण्यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला शिवसेना नेते-खासदार, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई मार्गदर्शन करणार आहेत. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सर्व पदाधिकारी व संलग्न असलेल्या सर्व समिती व त्यामधील सर्व आस्थापनातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या बैठकीत उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.