पंतप्रधान मोदींना देण्यात आलेल्या 2700 भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव 

विदेश दौऱ्यावर असताना हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून नरेंद मोदी यांना विदेशातून अनेक भेटवस्तू दिल्या जातात. आता याच भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या 2700 हून अधिक भेटवस्तूंचा 14 सप्टेंबर रोजी ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या एकूण 2,772 भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव होईल. ते म्हणाले की वस्तूंची किमान किंमत 200 रुपये आणि सर्वोच्च किंमत अडीच लाख रुपये आहे.

यावर्षी जानेवारीत सुरू झालेल्या एका लिलावात पंतप्रधानांना मिळालेल्या 1,800 हून अधिक भेटवस्तू विकल्या गेल्या. या लिलावातून मिळालेला पैसा केंद्र सरकारच्या महत्वकांशी योजना असलेल्या स्वच्छ गंगा अभियानात देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या