ऐन गर्दीच्या वेळी ओव्हरहेड तुटली; पेंटाग्राफ कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कल्याण

गेल्या महिनाभरापासून सततच्या बिघाडीमुळे चाकरमान्यांचा पुरता घामटा काढणाऱ्या मध्य रेल्वेने आजही दगा दिला. कल्याण – विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान  ओक्हरहेड वायर तुटली आणि पेंटाग्राफही कोसळला. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी सीएसएमटी – कर्जत मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली.  ही घटना सकाळी 8.30 वाजता घडली. ओव्हरहेड वायर एका महिलेच्या अंगावर पडल्याने ती होरपळली. तर स्फोटाच्या आवाजाने घाबरून उडी मारल्याने आणखी एक महिला जखमी झाली. त्यामुळे चाकरमान्यांना ट्रकवरून तंगडतोड करत पुढचे स्थानक गाठावे लागले.  तब्बल तीन तासांनंतर दुपारी 12 वाजता लोकल वाहतूक सुरू झाली. मात्र लोकलचे टाइमटेबल दुपारी चार वाजेपर्यंत कोलमडलेलेच होते. त्यामुळे  ‘मरे आता पुरे’ असा संताप चाकरमान्यांनी व्यक्त केला.

गेल्या 15 दिवसांत किमान 10 दिवस लोकल सेवेचा बोजकारा उडाला आहे. आज तर सकाळीच चाकरमान्यांना मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका सहन करावा लागला. सकाळी सवाआठ वाजता बदलापूरहून निघालेली लोकल विठ्ठलवाडी आणि कल्याण स्थानकादरम्यानच्या एफ केबीन आनंदकाडी ब्रीज पोल नंबर 5424 जवळ स्फोटाचा आवाज झाला आणि बंद पडली. वायर तुटल्याने आगीच्या ठिणग्या उडून स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत वायर तुटली.  ऐन कामावर जाण्याच्या वेळेत हा प्रकार झाल्याने लोकलमधील प्रवाशांनी खाली उतरून कल्याण रेल्वे स्थानक गाठले.

शटल सेकेचा आधार

कर्जत-सीएसएमटी सेवा ठप्प झाल्याने रेल्वेने सकाळी 9 ते 12 या वेळेत प्रवाशांच्या सेवेसाठी अंबरनाथ ते खोपोली आणि अंबरनाथ ते कर्जत मार्गावर शटल सेवा सुरू केली. शिवाय मुंबई मार्गावर कल्याणहून 5 आणि डोंबिवलीहून 2 विशेष लोकल सोडल्या. लोकल सेवा ठप्प झाल्याचे समजताच रिक्षाचालकांनी प्रवाशांची लुबाडणूक सुरू केली.

मेल एक्सप्रेसना कल्याण-डोंबिवलीत सक्तीचा थांबा

ओक्हरहेड वायर तुटल्याच्या घटनेनंतर लोकल आणि मेल एक्सप्रेस दोन्ही सेवा कोलमडल्या. डिझेल इंजिन असलेली उद्यान एक्सप्रेस वगळता इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या सर्क मेल आणि एक्सप्रेस गाडय़ांना कल्याण आणि डोंबिवली अशा अप-डाऊन मार्गावर सक्तीचा थांबा दिला.

दोन महिला प्रवासी बालबाल बचावल्या

बदलापुरहून मुंबईकडे निघालेली ही लोकल गर्दीने ओव्हर पॅक झाली होती. ओव्हरहेड वायर तुटली आणि ती लेडीज डब्यावर येऊन आदळली. त्याचा झटका दारात उभ्या असलेल्या  रुचिता सभागाने यांना बसला. या घटनेत त्या गंभीर होरपळल्या. तर स्फोटाच्या आवाजाने घाबरून निशा कुलकर्णी या महिलेने उडी मारल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. कल्याणमधील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.