ओवैसी आणि दहशतवादी बगदादी यांच्यात मुळीच फरक नाही! शिया वक्फ बोर्ड प्रमुखांची टीका

1431

खासदार असदुद्दीन ओवैसी आणि कुख्यात दहशतवादी इसिसचा म्होरक्या अबू बकर-अल बगदादी यांच्यात काडीचाही फरक नाही, अशी टीका शिया वक्फ बोर्डाचे प्रमुख वसीम रिझवी यांनी नुकतीच केली. अयोध्या प्रकरणावर आलेल्या निकालावर ओवेसी संतुष्ट नाहीत. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता रिझवी बोलत होते.

रिझवी पुढे म्हणाले की, या दोघांमध्ये काहीच फरक नाही. बगदादी दहशतवाद पसरविण्यासाठी लष्कर, हत्यारे आणि तोफगोळ्यांचा वापर करत होता, तर ओवैसी आपल्या तोंडाद्वारे दहशतवाद पसरविण्याचे आणि दहशतवादी कारवायांसाठी मुस्लिमांना उकसविण्याचे काम करत आहेत. आता तर परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, ओवैसी आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्यावर प्रतिबंध लादण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनीही प्रक्षोभक भाषणांमुळे असदुद्दीन ओवैसी हे दुसरे झाकीर नाईक बनू पाहात असल्याचे म्हटले आहे.

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत तारे तोडताना ओवैसी म्हणाले होते की, ‘सुप्रीम कोर्ट सर्वांच्या वर असले तरी ते अचूक नाहीत. मी त्यांच्या निर्णयावर संतुष्ट नाही. आम्हाला हिंदुस्थानच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही आमच्या अधिकारांसाठी लढतच राहणार आहोत. दान म्हणून देण्यात आलेली पाच एकर जमीन आम्हाला नको’ अशी मल्लिनाथी त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात 11 नोव्हेंबर रोजी तक्रारही दाखल झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या