
राज्यसभेत नागरिकता सुधारणा विधेयकावर वादळी चर्चा सुरू आहे. या विधेयकाबाबत बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी हे विधेयक असंवैधानिक असून न्यायालयात टिकणार नसल्याचे सांगितले. जे योग्य असेल त्यालाच मंजुरी द्यावी, ही आपली जबाबदारी आहे. आपण असंवैधानिक विधेयक मंजूर केले तर सर्वोच्च न्यायालय या विधेयकाबाबत निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयात हे विधेयक टिकणार नाही, असेही त्यांनी सांगितले. चर्चेदरम्यान चिंदबरम यांनी सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत.
Congress leader P Chidambaram on #CitizenshipAmendmentBill: This Bill will be challenged in the Supreme Court if it passes in the Parliament. I am absolutely certain that the judges of SC will strike it down. https://t.co/FZDVqRkVHo
— ANI (@ANI) December 11, 2019
नागरिकता सुधारणा विधेयक कलम 14 तील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. या विधेयकात काही कायदेशीर त्रुटी आहेत. त्याचे उत्तर कोण देणार आणि जबाबदारी कोण घेणार, या विधेयकाचा सल्ला ज्यांनी दिला, त्यांनाच संसदेत आणले पाहिजे. सरकारने फक्त तीन देशच का निवडले, इतर देशांना का वगळले, फक्त 6 धर्माच्या नागरिकांचाच या विधेयकात समावेश का आहे, असे सवालही चिंदबरम यांनी केले. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचीच निवड का केली, श्रीलंका आणि भूतानला का वगळण्यात आले, फक्त सहा धर्मांची निवड का करण्यात आली, अहमदिया, हजारा आणि रोहिग्यांचा यात समावेश का नाही, श्रीलंकेतील हिंदू आणि भूतानमधील ख्रिश्चनांना समावेश का नाही असे सवाल त्यांनी केले. विधेयकात फक्त धर्माच्या आधारे प्रताडीत झालेल्यांचा समावेश आहे. राजकीय प्रताडना झालेल्यांना नागरिकत्व का देण्यात येत नाही. भाषा, युध्द, संस्कृती, परंपरा यावरूनही प्रताडना होते, अशांचा समावेश का केला नाही. फक्त धर्माच्या आधारावर आणलेले हे विधेयक सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. असंवैधानिक विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी का सांगण्यात येत आहे असा सवालही त्यांनी केला.

























































