पाचोऱ्यातील व्यापार्‍याचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह, अमळनेर येथे एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील सिंधी काॅलनी परिसरातील एका 65 वर्षीय व्यापार्‍याचा वैद्यकिय अहवालही पाॅझिटिव आल्याने प्रशासनाने सिंधी काॅलनी परिसर सील केला आहे. तर अमळनेर येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 32 झाली असुन यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

पाचोरा येथील सिंधी काॅलनी भागातील एका व्यापाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे सिंधी कॉलनीलगतचा वरखेडी रोड व परिसर पञा व बॅरिकेट लाउन सिल केला आहे. या रूग्णाच्या घरातील 6 व संपर्कातील 13 अशा 19 जणांना काॅरेन्टाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, जळगावच्या कोव्हिड रुग्णालयात आज 30 एप्रिल रोजी एका कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यू झाला. अमळनेर येथील मृतांची संख्या 6 झाली असुन भुसावळचे दोन, जळगावच्या सालारनगरमधील एक व पाचोऱ्याच्या बागवान मोहल्यातील एक असे दहा जण कोरोनामुळे मयत झाले आहेत.