पाकिस्तानने नऊ महिन्यांत 2050 वेळा युद्धबंदी मोडली, परराष्ट्र मंत्रालयाने सुनावले खडे बोल

599

पाकिस्तानने गेल्या नऊ महिन्यांत 2050हून अधिक वेळा युद्धबंदी मोडली असून त्यात 21 निष्पाप हिंदुस्थानी नागरिकांचे बळी गेले आहेत. पाकिस्तानचे हे उपद्व्याप अजूनही बंद झाले नसल्याचे सांगत परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. दहशतवाद्यांना हिंदुस्थानात घुसण्याची संधी देण्यासाठीच युद्धबंदी मोडण्याचे प्रकार पाकिस्तानकडून होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

पूंछ येथील मेंढर सेक्टरमध्ये लष्कराने शनिवारी पाकड्यांनी मारा केलेले जिवंत मोर्टार निकामी केले. त्याच दिवशी बालाकोट गावातील एका घरात पडलेले मोर्टारही लष्कराने ताब्यात घेतले. सुदैवाने या कोणत्याही घटनेत जीवित वा वित्तहानी झाली नाही. रवीशकुमार पुढे म्हणाले की, 2003 पासून हिंदुस्थान पाकिस्तानला युद्धबंदी मोडू नका आणि दोन्हीकडच्या सीमांवर शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवा, असे सांगत असतानाही पाक सैनिकांचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. अशावेळी हिंदुस्थानी जवान पाकड्यांना खणखणीत प्रत्युत्तर देत आहेत, असेही रवीशकुमार यांनी स्पष्ट केले.

पाकड्यांच्या दोन सैनिकांचा खात्मा

गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानी सैन्याने वारंवार युद्धबंदी मोडून गोळीबार सुरू ठेवला आहे. 10 आणि 11 सप्टेंबरलाही पाक सैन्याचा हा प्रकार सुरू असताना हिंदुस्थानी जवानांनी त्याला प्रत्युत्तर देताना पाकड्यांच्या दोन सैनिकांचा खात्मा केला होता. त्यानंतर पाकिस्तानने कब्जा केलेल्या कश्मीरमधील हाजीपूर सेक्टर येथून पाक सैन्य पांढरा झेंडा दाखवत आपल्या सैनिकांचे मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला.

.

आपली प्रतिक्रिया द्या