‘कालनिर्णय’ची ‘पाकनिर्णय’ स्पर्धा

कालनिर्णयतर्फे वाचकांसाठी पाकनिर्णय 2025 या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तंदूर/ ग्रिल्ड पदार्थ, धिरडी/ थालीपीठ / डोसा, केक, नट्स आणि सीड्स वापरून बनवलेले पदार्थ असे चार विभाग स्पर्धेसाठी ठरवण्यात आले असून प्रत्येक स्पर्धक जास्तीत जास्त दोन विभागांसाठी पाककृती पाठवू शकतो.

स्पर्धकांनी आपली पाककृती आणि पाककृतीचा पह्टो [email protected] या ई-मेलवर किंवा कुरियरने सुमंगल प्रेस प्रा.लि., 172, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इमारत, दादर पूर्व या पत्त्यावर 31 मे 2024 पूर्वी पाठवावेत. सर्वोत्कृष्ट 12 पाककृती कालनिर्णय मराठी 2025 मध्ये तर उत्तेजनार्थ 18 पाककृती कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील.