
पाकिस्तान आणि चीन यांच्या इस्लामाबादमध्ये मोठी डील झाली आहे. या डीलनंतर आता चीन पाकिस्तानला उघडपणे माहिती शेअर करणार आहे. यासाठी दोन्ही देशांनी एका करारावर स्वाक्षरीसुद्धा केली आहे. यावेळी चीनचे राजदूत आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी उपस्थित होते. ही डील अशा वेळी झाली आहे, ज्यावेळी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये कहर केला आहे. या डीलमुळे शेजारी देश पाकिस्तान आणि हिंदुस्थानवरसुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. या करारामुळे चीनचे एजंट पाकिस्तानात उतरून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीविरोधातील माहिती पाकिस्तानला देतील. या डीलचा परिणाम हिंदुस्थान आणि बांगलादेशवरसुद्धा होण्याची शक्यता आहे.





























































