
पाकिस्तानच्या सर्वोच्च निवडणूक संस्थेने माजी पंतप्रधानांच्या अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी केल्यामुळे इम्रान खान यांना भविष्यात निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आलेली नाही, असे निरीक्षण इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज नोंदवले.
इम्रान खान यांनी मालमत्ता लपवल्याबद्दल पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. त्या निर्णयाला इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात आक्हान दिले. मुख्य न्यायमूर्ती अथर मिनाल्लाह यांनी त्यावर सुनावणीवेळी निरीक्षण नोंदवले की, इम्रान खान यांना भविष्यातील निवडणुकी लढण्यास प्रतिबंधित करण्यात आले नव्हते आणि ते 30 ऑक्टोबर रोजी खैबर-पख्तुनख्का प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात लढण्यास पात्र होते.

























































