पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, पुंछ भागात गोळीबार

34

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून सोमवारी पुंछ जिल्ह्यात गोळीबार करण्यात आला आहे. हिंदुस्थानी सैन्याने गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या गोळीबारात कुणीही दगावल्याचं वृत्त नाही.

अद्यापही काही मिनिटांच्या अंतराने गोळीबार सुरू असून हिंदुस्थानकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यापूर्वीही शनिवारी पाकड्यांनी पुंछ येथील सीमाभागात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. याच दिवशी केंद्रीय सरंक्षण राजनाथ सिंह हे कश्मीर दौऱ्यावर होते. त्यावेळी पाकिस्तानकडून मोर्टार डागण्यात आले आणि गोळीबारही केला गेला.

आपली प्रतिक्रिया द्या