इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक? पोलीस निवासस्थानी पोहोचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोशाखाना सरकारी डिपॉझिटरीतून मिळालेल्या भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व तेहरिक ए इंसाफचे अध्यक्ष इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. लाहोर पोलिसांचा मोठा फौजफाजा सध्या इम्रान खान यांच्या जमान पार्क या निवासस्थानी पोहोचला असून त्यांना अटक होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे वातावरण गेल्या काही दिवसांपासून आहे. त्यामुळे इम्रान यांच्या लाहोरमधील घराबाहेर त्यांचे हजारो समर्थक जमा झाले आहेत. अनेक भागात हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. तोशाखाना नावाच्या सरकारी डिपॉझिटरीतून मिळालेल्या भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे.