भांडणानंतर चिडलेल्या नवऱ्याने कापलं बायकोचं नाक

633

पाकिस्तानमधील लाहोर शहरात भांडणादरम्यान संतापलेल्या नवऱ्याने पत्नीचे नाकच कापले. पण एवढे करुनही त्याचे मन न भरल्याने त्याने तिचे केस कापून तिला विद्रुप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

पीडित महिलेच्या मुलीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. पीडित महिला व तिच्या पतीमध्ये सतत क्षुल्लकशा कारणावरून वाद होत असत. काही दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला. यावेळी पतीचा रागाचा पारा इतका चढला की त्याने जवळच पडलेल्या पाईपने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो बाहेर गेला आणि चाकू घेऊन आला. त्यानंतर त्याने पत्नीच्या नाकावरच वार करत तिचे नाकच कापले. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. पण तरीही पतीला तिची दया आली नाही. उलट त्याने नंतर त्याच रक्ताळलेल्या चाकूने तिचे केस कापले व तिथून पळ काढला. त्यानंतर शेजारच्यांच्या मदतीने मुलीने पीडीतेला रुग्णालयात दाखल केले. असे पीडितेच्या मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेच्या मदतीसाठी अनेक महिला संघटना समोर आल्या आहेत. आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या